पैठण (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथे दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरामध्ये करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ भारत माता व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष तांबे पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, प्रमुख अतिथी पत्रकार बांधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शब्दांच्या या धारेवरती, लोकशाहीची शान आहे. लेखणी आमची तलवार, शब्द आमची ढाल आहे. या काव्यापंक्ती प्रमाणेच कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा गौरव दर्पण दिनाच्या औचित्याने करण्यात आला.
या शुभ प्रसंगी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, नानक वेदी, दादासाहेब गलांडे, रमेश शेळके, नंदकिशोर चव्हाण, गौतम बनकर, मनोज खुटेकर, चंद्रकांत अंबिलवादे, राहुल पगारे, नंदकिशोर मगरे, शिवाजी गाडे, विनोद लोहिया, ज्ञानेश्वर बावणे, आशिष तांबटकर, दशरथ अडसूळ, मदन आव्हाड, गणेश औताडे, बबन उदावंत, तुषार नाटकर, एकनाथ काळे, कैलास बर्फे, संतोष तांबे आदींचा गौरव उत्साहात झाला.
दर्पण दिनाविषयी मदन आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर अध्यक्षिय भाषणात संतोष तांबे यांनी वृत्तपत्र, सोशल मीडिया यांचे महत्व आणि त्यांची भूमिका मांडली. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई येथील केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भास्कर कुलकर्णी यांचा सत्कार उपस्थित पत्रकार बांधवानी केला. प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्कर कुलकर्णी यांनी केले. अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, संचालक विजय चाटूपळे, नंदकिशोर मालाणी, प्रसिद्धी विभाग प्रमुख आशुतोष पानगे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विलास खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन आशुतोष पानगे यांनी केले.













